Breaking
महाराष्ट्र

119 येवला विधानसभा मतदारसंघ मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी येवला – बाबासाहेब गाढवे यांच्या वतीने जनतेला आवाहन

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील, मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 2 4 0 8 6

न्यायभूमी 

येवला, दि.०१ ऑक्टोबर २०२६

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) येवला विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. याअंतर्गत सुनावणीपूर्वी बीएलओ आता घरोघरी जाणार असून, मतदारांना नोटिसा देणे व आवश्यक कागदपत्रे संकलित करणे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. एसआयआर अंतर्गत नोटीस मिळालेल्या हरकत नाय मतदार यादीतून कमी केले गेले, असा गैरसमज करून घेऊ नये. मतदारांनी घाबरून जाण्याचे गरज नाही.

बीएलओ मतदारांना नोटीसा देण्यासाठी घरोघरी जाणार आहेत. त्यावेळी ते संबंधित व्यक्तीचे मूळ आवश्यक कागदपत्रे स्वीकारतील. कागदपत्रे पात्र मतदार वंचित राहणार नाही, याबाबत खात्री बाळगावी.

मतदारांनी ही कागदपत्रे तयार ठेवावीत :
आधार कार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, १९५१, रहिवासी प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, पासपोर्ट, बँकेचे पासबुक, घरपट्टी पावती, किंवा विहित नमुन्यातील कुटुंबातील व्यक्तीचे कागदपत्रे.

मतदारांनी आपले नाव मतदार यादीत तपासावे. प्रगणन मतदार यादीत नाव तपासण्यासाठी मतदारांना मतदान केंद्रनिहाय यादी अथवा http://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर नाव तपासता येईल.

ज्या मतदारांना नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह बीएलओ यांच्याकडे अथवा ऑनलाइन http://voters.eci.gov.in वर सादर करावा.

मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यात येणार असून, सुनावणीअंती अंतिम निर्णय घेण्यात येईल. तरी सर्व पात्र मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, 119 येवला विधानसभा मतदारसंघ श्री. बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे. 

 संपर्क :निवडणूक शाखा, उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला 

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 2 4 0 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे