Breaking
महाराष्ट्र

मृत गोरख अस्वले कुटुंबीयांना न्याय मिळण्याची मागणी

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी

विंचूर दिनांक ०४ नोव्हेंबर मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर

विंचूर वनसगांव (ता.निफाड) येथील स्व गोरख आप्पा अस्वले (वय ३०) यांचा दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवडी गेट (ता.निफाड) येथे चुकीच्या दिशेने उभ्या असलेल्या रोड रोलर वर धडकून अपघात झाला.

 त्यातच त्यांचे निधन झाले.मृत गोरख अस्वले व कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी ऑल इंडिया संविधान आर्मी,श्री महाकाल गृप यांच्या वतीने निफाड उपविभागीय अधिकारी,निफाड तहसीलदार,निफाड उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात अपघातास कारणीभूत ठरलेल्या रोड रोलर चालक व मालक यांच्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.सदर रोड रोलर चालक व मालकावर कारवाई करण्यात यावी.

 मृत गोरख अस्वले यांची कावासाकी फोरएस क्र.एम.एच १७ बी.५४०६ ही अपघातातील दुचाकी जमा करुन स्क्रप करण्यास देण्यात आली. असे पोलीस प्रशासनाच्या वतीने गोरख अस्वले यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात येते.

गोरख अस्वले यांची दुचाकी परत मिळावी तसेच मृत गोरख अस्वले यांचा वीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल घटनास्थळावरून गहाळ झाला आहे.या मोबाईलचे १ जानेवारी २०२५ ते ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंतची कॉल रेकॉर्ड मिळावे.

गोरख अस्वले हे अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. व घरातील एकमेव कमावती व्यक्ती होते.त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी व लहान भाऊ आहे.

मृत गोरख अस्वले व कुटुंबीयांना येत्या आठ ते दहा दिवसात न्याय मिळावा अन्यथा ऑल इंडिया संविधान आर्मी,श्री महाकाल गृप व अन्य दहा संघटनांच्या वतीने नाशिक जिल्हा पोलिस प्रशासन कार्यालय व निफाड तालुका पोलिस ठाण्या समोर आंदोलन छेडण्यात येईल.

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा देण्यात आला आहे.

3/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे