न्यायभूमी न्यूज
नासिक दि २३ जून विशेष प्रतिनिधी रोशन गव्हाणे
मा.श्री.बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण यांनी मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या अनुषंगाने मनमाड शहरातील मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढण्यात आली.
मनमाड शहरातील विविध भागात मादक पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
परंतू एका ठिकाणी छापा कारवाई झाल्यानंतर इतर विक्री करणारे इसम सावध होवून मुद्देमाल लपवून ठेवण्याची शक्यता होती.
मा.श्री.बाळासाहेब पाटील- पोलीस अधीक्षक,मा.श्री.तेगबीर सिंग संधू अपर पोलीस अधीक्षक मालेगाव,मा.श्री.बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांचे मार्ग दर्शनाखाली छापा कारवाई करीता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे ०३ विविध पथके तयार करण्यात आले.
मादक पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर छापा कारवाईची माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे ०३ पथके एकाचवेळी ०३ विविध ठिकाणी छापा कारवाई करीता पाठवण्यात येवून एकानंतर एक असे छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस पथकाद्वारे मनमाड शहरातील खालील नमुद इसम हे त्यांचे राहत्या घरी गांजा हा मादक पदार्थ विक्री करतांना मिळून आले आहे.
त्यांचे विरूध्द मनमाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री.विजय करे-पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
कलम मनमाड शहर पोलीस ठाणे गु.२.नं. ३९३/२०२५ आरोपी गुंगीकारक अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम कायदा १९८५ चे कलम २० (ब) ⅱ) अ (व २२ मुद्देमाल संदीप उर्फ धोंडू देविदास व्यवहारे,वय ५० वर्ष,रा.मुक्तांगण,मनमाड ता.नांदगाव जि.नाशिक ३०,६६०/- रू किमतीचा ०३ किलो ६६ प्रेम वजनाचा गांजा कलम मनमाड शहर पोलीस ठाणे- गु.र.नं. ३९४/२०२५ गुंगीकारक अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम कायदा १९८५ चे कलम २० (ब) ii) अ (व २२आरोपी तुकाराम देवबा गवळी,वय- ४० वर्ष,रा.गवळीवाडा,मनमाड ता.नांदगाव जि. नाशिक मुद्देमाल ५१,४००/- रू किमतीचा ०५ किलो १४० ग्रॅम वजनाचा गांजा गुरनं.मनमाड शहर पोलीस ठाणे- गु.र.नं. ३९५/२०२५ कलम गुंगीकारक अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम कायदा १९८५ चे कलम २० (ब) ii) अ (व २२ आरोपी इरफाना रऊफ पठाण, वय ३५ वर्ष,रा.हुसैनी चौक,टकार मोहल्ला,मनमाड ता. नांदगाव जि.नाशिक मुद्देमाल २०,१००/- रू किमतीचा ०२ किलो १० ग्रॅम वजनाचा गांजा सध्या ०३ गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून नेमका गांजा कडून आणण्यात आला आहे.
याची माहिती प्राप्त करून घेत आहोत.
गांजा विक्री करणाऱ्या आरोपी विरूध्द छापा कारवाई पथकामध्ये सपोनि हेमंत भंगाळे, सपोनि भारत जाधव,सपोनि कौशल वाघ,पोउनि प्रतिक भिंगारदे,सपोउनि विजय शिंदे,सपोउनि इमदाद सय्यद,पोहवा अशोक व्यापारे,पोहवा दिलीप शिंदे,पोहवा शिवाजों कापडणे,पोहवा पंकज देवकाते,पोकों संदीप झाल्टे,पोकों रणजित चव्हाण,पोकों राजेंद्र खैरनार, पोकॉ.गोरख आहेर,पोकों अशोक भाबड,पोकों अभिजीत उगलमुगले,मपोहवा दिपाली आव्हाड,मपोकों संगिता वाटपाडे,मपोकों मनिषा उंबरे,मपोकों मालिनी अंभोरे,मपोकों प्रतिक्षा पवार यांचा सहभाग होता.
समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की,तरूणाई ही नशेच्या अधीन होत असल्याने कोणत्याही वाजवी कारणाशिवाय तरूण मुले ही रात्रीच्या वेळी मोटारसायकल वरून बाहेर फिरणार नाही तसेच त्यांचेवर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.
पोलीस निरीक्षक श्री.विजय करे यांनी मादक पदार्थाची विक्री करणाऱ्या व्यक्तींबद्दलची गोपनीय माहिती व्यक्तीशः भेटून / फोनद्वारे द्यावी.
गोपनीय माहिती देणाऱ्या इसमाची ओळख उघड केली जाणार नाही बाबत आवाहन केले आहे.
