Breaking
महाराष्ट्र

बार्टी कडून रचिली स्वराज्याची गाथादैवत असे ती राजमाता जिजाऊ स्मृतिदिन विनम्र अभिवादन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

हिंगोली वसमत दि.१८ जून प्रतिनिधी आळणे मिलिंद

वसमत: श्री कम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे,मिलिंद आळणे,सर्वप्रथम राजमाता मा साहेब जिजाऊ पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम वडे सर रुंज (तालुका अध्यक्ष धनगर समाज) प्रमुख पाहुणे सतीश कदम सर हे होते.

हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ चा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांच्या भूमिकेमुळेच शिवाजी महाराज एक पराक्रमी शासक आणि न्यायप्रिय राजा म्हणून उदयास आले.

 राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली त्यांनी शिवाजी महाराजांना युद्ध कला राजनीति आणि न्यायशास्त्राचे शिक्षण दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली.

जिजाऊंनी स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्या एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात.

यावेळी श्रीराम वड्डेसर,सतीश कदम,शरद नाद्रे,गायत्री राऊत,कांचन डोके,गायत्री चिकाले, प्रगती झुंझुल्डे,आलंका शिंदे,राधा खंदारे,रुद्र जाधव,सलोनी सरोदे,प्राजक्ता नादरे,ऋतुजा नादरे,वैष्णवी राऊत,अंबू चांदणे,राधा पंधोडे श्री कॉम्प्युटर चे सर्व विध्यार्थी खूप मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे