Breaking
आरोग्य व शिक्षण

शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा गौरव

सुकदेव वामनराव रायते (दादा) यांचा 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवस नूतन विद्यालयात उत्साहात साजरा

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज

खडक माळेगाव  दि. २९ सप्टेंबर (ता.निफाड) प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर भवर

 शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस तथा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यकर्ते श्री.सुकदेव वामनराव रायते (दादा)यांचा 75 वा अमृतमहोत्सवी वाढदिवस नूतन विद्यालयात मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे माजी अध्यक्ष श्री.नामदेवराव आण्णा रायते सर यांनी भूषविले. या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, गावातील मान्यवर ग्रामस्थ तसेच रानवड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान सरपंच श्री.दत्तात्रय पाटील डुकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

सर्व मान्यवर व हितचिंतकांनी श्री. रायते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

श्री.पी.डी.मदगे यांनी सत्कारमूर्तींच्या शैक्षणिक,सामाजिक तसेच कौटुंबिक आयुष्यातील विविध रंगी अनुभवांची मनोगते मांडून त्यांच्या कार्याचा जीवनपट उलगडला.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.दत्तात्रय माधवराव रायते,गावचे भूषण प्रा.बी.बी.रायते,माजी चेअरमन श्री.सुरेश नथू रायते,तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब रायते यांनी आपापल्या भावना व्यक्त करून दादांना आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गावचे विद्यमान सरपंच श्री.जगदीश पवार यांनी श्री. रायते यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी सांगितल्या. या सोहळ्यात श्री.गौरव शांताराम रायते यांचा एम.पी.एस.सी.मार्गे प्रशासकीय सेवेत रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्तींच्या पत्नी सौ.ज्योती सुखदेव रायते यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम.बी. रायते, पर्यवेक्षक श्री.एन.आर.बोरसे, उपमुख्याध्यापक श्री.आर.एम.परदेशी,तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीवर्ग,संस्थेचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.एस.शिर्के यांनी तर अध्यक्षीय भाषणातून श्री.नामदेवराव आण्णा रायते यांनी श्री सुकदेव दादा रायते यांना जन्मशताब्दी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

या विशेष प्रसंगी श्री.सुकदेव वामनराव रायते (दादा )यांनी नूतन विद्यालय,जि.प शाळा खडक माळेगाव व जि.प प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार व पुस्तके भेट देऊन सोहळ्याची सांगता आनंदमय वातावरणात झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे