Breaking
आरोग्य व शिक्षण

नेत्र तपासणी शिबिर दि.२ मे रोजी सकाळी १० वाजता भावसार ऑप्टिकल्स,यश प्लाझा,लासलगाव येथे उत्साहात संपन्न

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी 

 लासलगाव दिनांक ०२ मे महेश साळुंके 

लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईड यांच्या वतीने शरद पाटील यांचे सुशील आय हॉस्पिटल,कल्पतरू लायन्स आय हॉस्पिटल तसेच भावसार ऑप्टिकल्स यांच्या सहकार्याने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हे शिबिर दि.२ मे रोजी सकाळी १० वाजता भावसार ऑप्टिकल्स,यश प्लाझा,लासलगाव येथे उत्साहात संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या माजी सभापती सौ.सुवर्णाताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.युवराज पाटील उपस्थित होते.

या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ९३ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

नेत्र चिकित्सक डॉ.अशमाला शेख यांनी नागरिकांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.

तसेच हेमंत भावसार व गिरीश भावसार यांनीही तपासणी कार्यात सहकार्य केले.तपासणीत ४ रुग्ण मोतीबिंदू,१ रुग्ण काचबिंदू,१ रुग्ण कॉर्नियल उपचारासाठी तर ४ रुग्ण प्टेरीजियम समस्येसाठी आढळून आले असून त्यांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सौ.सुवर्णाताई जगताप यांनी डोळ्यांची नियमित तपासणी ही काळाची गरज असून ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

डॉ.युवराज पाटील यांनी बदलती जीवनशैली,वाढता स्क्रीन टाइम व दुर्लक्ष यामुळे नेत्रविकार वाढत असून वेळेत निदान होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास बापू लचके,संजय बिरार,अर्चना पानगव्हाणे,अझहर पठाण,डॉ.भाग्यश्री सोनवणे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन दीपक जाधव यांनी,प्रास्ताविक संजय डमरे यांनी केले तर आभार अध्यक्ष हेमंत पवार यांनी मानले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राईडचे राजाबाबा होळकर,प्रदीप माठा सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे