Breaking
आरोग्य व शिक्षण

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,स्वावलंबी जीवनशैलीची रुजवनुक करण्यात स्काऊट-गाईड आदर्श चळवळ:- जयदत्त होळकर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

रानवड दि १० फेब्रुवारी प्रदिप वाघ 

स्काऊट गाईड जिल्हा मेळावा निफाड तालुक्यातील काकासाहेब नगर (रानवड) येथे सुरू झाला आहे. आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.शोभा यात्रेचे उद्घाटन लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केले.

यावेळी लासलगाव बाजार समिती संचालक भीमराव काळे,रानवड शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण वाघ,प्राचार्य गोविंद कुशारे,

नायगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब कलकत्ते हे उपस्थित होते.

जिल्ह्यातील शहरी,ग्रामीण यासारख्या विविध भागांतून ६४ शाळांमधील स्काऊट व गाईड पथके या मेळाव्यात सहभागी झालेले आहे.मेळावा स्थळी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभागी होत मेळाव्याचा आनंद घेत आहेत.

घर परिवार सोडून तंबूमध्ये निवास करताना धैर्य,शिस्त,अनुशासन यासारख्या गुणांचा विकास होऊन विद्यार्थ्याचे सामाजीकिकरण होण्यास मोठी मदत होते.मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण लासलगाव मार्केट कमिटी संचालक भीमराज काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्काऊट सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळांचे अध्यक्ष मच्छिंद्र कदम आणि गाईड सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या विस्वस्त शकुंतलाताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

शेकोटी कार्यक्रम उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळांचे अध्यक्ष कदम यांनी विद्यार्थी जीवनातील स्काऊट गाईड चे महत्व प्रतिपादन केले.शकुंतलाताई वाघ,मच्छिंद्र कदम यांनी स्काऊट,गाईड विद्यार्थ्यांच्या निवासी तंबूना भेटी देत विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले.

शेकोटी प्रार्थना गायन केल्यानंतर स्काउटर विद्यार्थ्याचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.३०शाळेतील स्काऊट व ४५ शाळेतील गाईड विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे कसब दाखवत वारकरी नृत्य,गोंधळी नृत्य,सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणाऱ्या नाटिका,समूह गीत गायन,पाश्चात्य संगीतातील रॅम्प साँग यासारखे विविध कलाविष्कार सादर केले.

काकासाहेब नगर येथे काढलेल्या शोभा यात्रेत कुंभमेळा,महाराष्ट्र दर्शन,संविधान जागर,स्वच्छ्ता,बेटी बचाव या विषयक पथनाट्य सादर केले.खेडलेझुंगे विद्यालयाने सादर केलेल्या संभाळ वाद्याच्या ठेक्यावर भिमराव काळे यांच्यासह उपस्थितांनी ठेका धरला.फुड प्लाझा या खाद्य संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या स्पर्धेत जंक फूड पासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत आरोग्यदायी आहार पद्धतीची जागृती केली.

खाद्य पदार्थांच्या सजवतीतून स्काऊट गाईड अभ्यासक्रमातील विविध गाठीची ओळख करून पदार्थ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनासाठी ठेवले होते.

पायोनेरींग स्पर्धेत अभ्यासक्रमातील गाठींचा वापर करून झुला,टेहळणी मनोरे,कसरतीचे खेळ साहित्य बनवले.डोळ्यांचे पारणे फेडणारे शारीरिक कसरतीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सादर केले.

लेझिम कवायत,लाठीकाठी,उंच मनोरे,योगासने ही प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मने जिंकली.मेळावा नियोजनासाठी

स्काऊट जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे,गाईड जिल्हा संघटक कविता वाघ,रानवड विद्यालयाचे प्राचार्य गोविंद कुशारे,भीमराज काळे,हरीचन्द्र टोपे,नवनाथ वाघचौरे,संगीता सोनार,खंडू आरगडे, वनिता भोजराज,मेघा शेजवळ,रुक्सार मन्सूरी,बद्रीनाथ रायते,प्रवीण पानपाटील,अर्जुन टिळे, रेखा निकुम, बाळकृष्ण शिंदे यांच्यासह नियोजन समिती सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन करत मेळावा यशस्वी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे