अबॅकस मुलांची दणदणीत कामागिरी स्पर्धेत अव्वल
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
वसमत दि. ०५ डिसेंबर विशेष प्रतिनिधी
रिजनल लेवल कॉम्पिटिशन नांदेड येथे घेण्यात आले.त्या कॉम्पिटिशनमध्ये 26 सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
त्यामध्ये शौर्य प्रोॲक्टिव्ह अबॅकस सेंटर वसमत सेंटरचे एकूण 33 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
त्यातील 20 विद्यार्थी नॅशनल परीक्षेमध्ये सिलेक्ट झाले व 13 विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्सचे गोल्ड मेडल मिळाले व तसेच संचालिका प्रतीक्षा पवळे यांना बेस्ट सेंटर आणि बेस्ट टीचर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अकोला येथे 6 जुलै 2025 रोजी रिजनल लेवल कॉम्पिटिशन घेण्यात आली होती त्यावेळी पण नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षांमध्ये 37 विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यातील सर्वांच्या सर्व विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास झाले आणि नॅशनल कॉम्पिटिशन अकोला मध्ये तब्बल वीस विद्यार्थी विजेते ठरले विशेष बाब म्हणजे हसन आणि हुसेन ही दोन्ही मुले जुळे आहेत 850 विद्यार्थ्यांमधून पेपर हा सहा मिनिटांचा असतो 100 गणित असतात आणि हुसेन हा मुलगा 2 मिनिट 20 सेंकद मध्ये पेपर सोडवला आहे.
दुसरा म्हणजे हसन हयाने तोच पेपर 2 मिनिट 26 सेंकद मध्ये सोडवला आहे त्यामुळे 850 विद्यार्थामधून गणिताचा जादूगर ( Math-magician of day ) ट्रॉफी व प्रमाणपत्र हुसेन ला मिळाली.
नॅशनल ला पात्र झालेले विद्यार्थी
साईनाथ पोते,शिवम झाडे,आदिती येणावार, आरव आवटे,कर्तव्य नरवाडे,उत्कर्ष दातार,सृष्टी वडगावे,स्वराज वावळे,कनिष्क कदम,हुसेन शेख, समीक्षा रिठे,समीक्षा सोनटक्के,समिद थोरात, गणेश पवळे,समर्थ पवळे,राणी सोनटक्के,प्रेम सोनटक्के,विशेष पवळे,वैष्णवी जोगदंड
गोल्ड मेडल मिळवलेले विद्यार्थी
प्रतीक्षा मोरे,लखन गाडे,द्रुव पडघान,सांची पडघान,ऋषिकेश पौळ,ऋतुजा चिंतारे,दृष्णा थोरात,हसन शेख,वेदांत गुळगुळे,कबीर कदम, ओजस्वी दातार,शिवम पवळे,प्रगती भवाळे, अनन्या कुराल सर्व विद्यार्थ्यांचे व प्रतीक्षा पवळे मॅडमचे कौतुक होत आहे.