Breaking
आरोग्य व शिक्षण

तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेत वैष्णवी कापसे प्रथम

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 8 3 0 7

न्यायभूमी

 चांदवड दि.११ ऑगस्ट सहसंपादक सुनील पोळ 

      मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बालविकास मंदिर वडाळीभोई येथे सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र समाज संस्था आयोजित तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न करण्यात आली.

चांदवड तालुक्यातील एकूण 28 शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.अतिशय चुरशीच्या या स्पर्धेमध्ये सनराइज् स्कूल वडनेर भैरव येथील विद्यार्थिनी कु वैष्णवी कापसे हिने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा स्तरावरील आपले स्थान निश्चित केले तर वडाळीभोई विद्यालयातील विद्यार्थिनी कु स्वरा गवांदे हिने देखील द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचा नावलौकिक वाढविला.

त्याचप्रमाणे जनता विद्यालय भालूर येथील विद्यार्थिनी कु प्रांजली साळुंखे,न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थी कु शाहू पवार आणि जनता विद्यालय पिंपळद येथील विद्यार्थिनी कु श्रद्धा ठोंबरे या विद्यार्थ्यांनी देखील उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्पर्धेचे केंद्र असलेल्या शाळेतील मुख्याध्यापिका मा.सौ संगीता सोनवणे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 8 3 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे