महाराष्ट्रातील रब्बी कांद्याला प्रति क्विंटल २,१२५ रुपये किमान हमी खरेदी किंमत
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.०५ जुलै कैलास उपाध्ये
महाराष्ट्रातील रब्बी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या ग्राहक व्यवहार विभागाने २०२६ च्या रब्बी कांद्याच्या खरेदीसाठी किमान हमी खरेदी किंमत प्रति क्विंटल २,१२५ रुपये निश्चित केली असून हा दर ४ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या कॉस्टिंग सेलकडून जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन स्मरणपत्रानुसार, महाराष्ट्रातील रब्बी कांद्याची खरेदी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे बाजारभावात चढ-उतार झाल्यास शेतकऱ्यांना किमान हमी दराचा आधार मिळणार असून त्यांच्या उत्पन्नाला काही प्रमाणात संरक्षण मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संबंधित आदेश सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने जारी करण्यात आला असून, या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
• केंद्र शासनाने कांदा खरेदी दरात वाढ केली असली तरी खुल्या बाजारात २५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव आहेत.
त्यामुळे पुन्हा केंद्र सरकारचे वराती मागून घोडे आहे.त्यामुळे शासकीय कांदा खरेदीचे दर वाढून ३ हजार ते ३ हजार पाचशे रुपये करावे.
जयदत्त होळकर
कांदा विषय तज्ञ



