Breaking
महाराष्ट्र

महावितरण प्रशासनाला इशारा: शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या,लोडशेडिंग बंद करा!

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 1 0 1 5 1

न्यायभूमी

नाशिक दि.१९ जुलै 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दिंडोरी,पेठ, कळवण,सुरगाणा,चांदवड,देवळा,निफाड,येवला आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये सायंकाळच्या वेळेत सुरू असलेले भारनियमन (लोडशेडिंग) आणि अघोषित वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना शेतकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.असे असतानाही महावितरण प्रशासन शेतकऱ्यांच्या या गंभीर आणि जीवघेण्या प्रश्नाकडे महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे,अधीक्षक अभियंता अनिल थोरात आणि कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांना निवेदन देत ग्रामीण जनतेच्या भावना त्यांच्यासमोर मांडत शेतकरी हिताच्या मागण्या सोडविण्यासाठी सूचना केल्या.

शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा.

ग्रामीण भागातील सायंकाळचे लोडशेडिंग आणि अघोषित वीज कपात तातडीने बंद करण्यात यावी.

ओव्हरलोडिंग व तांत्रिक कारणांमुळे होणारी वारंवार वीज खंडित होण्याची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करण्यात याव्यात.

फीडर विभक्तीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शेती व घरगुती वीजपुरवठा स्वतंत्र करण्यात यावा.

शेतकऱ्यांना रात्री जीव धोक्यात घालून शेतीला पाणी द्यावे लागू नये,विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि ग्रामीण जनतेला त्यांचा हक्काचा अखंडित वीजपुरवठा मिळावा.

यासाठी महावितरणने तातडीने यावर सकारात्मक पावले उचलून शेतकरी व ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा.

अशी आग्रही मागणी निवेदनात केली आहे. बळीराजाचा हा प्रश्न पूर्णपणे सुटेपर्यंत माझा हा पाठपुरावा सुरूच राहणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 0 1 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे