कर्तृत्ववान व्यक्तींचे मार्गदर्शन व सल्ला घेऊनच विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी – व्हा.चेअरमन अरुण वारुंगसे
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि १० फेब्रुवारी प्रतिनिधी:-
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने होते. व्यासपीठावर पेशवे पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अरुणशेठ वारुंगसे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोकराव गवळी, माजी सरपंच शरदराव माळी ,भारतीय सैन्य दलात कप्तानपदी कार्यरत असलेले मच्छिंद्र वारुंगसे ,पोलीस पाटील रामदास वारुंगसे,दापूरचे केंद्रप्रमुख संजय आव्हाड, मुख्याध्यापक रामदास वाजे ,जेष्ठ शिक्षक दिगंबर, जाधव, उत्तम कामडी आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या वतीने शिवम शिंदे, सोनाली चव्हाण ,लावण्या वाजे,श्रावणी वारुंगसे, ऋतुजा वामने, श्रद्धा माळी यांनी तर शिक्षकांच्या वतीने सोमनाथ पगार, डी. ए. रबडे, राजेंद्र गांगुर्डे तर ग्रामस्थांच्या वतीने मच्छिंद्र वारुंगसे, डुबेरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून परीक्षा पद्धतीविषयी माहिती दिली.
आपल्या शालेय जीवनातील कठीण प्रसंग सांगून उपस्थितांची मने हेलवून टाकली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वामने म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगती करावी.
यावेळी बोलताना श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अरुण वारुंगसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून प्रगती करावी. भविष्यात शाळा व गावच्या विकासाठी एकत्र यावे.
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी.विविध कर्तृत्ववान व्यक्तींचे मार्गदर्शन व सल्ला घेऊनच विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे आव्हान वारुंगसे यांनी केले.
सर्वच विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन करावे अशी अपेक्षा सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन जयश्री गोहाड यांनी तर आभार सोमनाथ गिरी यांनी मानले.
यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

