श्री नेताजी सुभाष चंद्र बोस स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ०९ मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

श्री नेताजी सुभाष चंद्र बोस स्कूल वाहेगाव येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
(दि. ०८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री नेताजी सुभाष चंद्र बोस स्कुलचे अध्यक्ष डॉ प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा कर्तबगार, धाडसी महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
दैनंदिन जीवन जगत असतांना आपत्तीग्रस्त आणि विधवा महिलांना अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जात नाही.
त्यामुळे अशा महिलांची होणारी कुचंबना दूर करण्याच्या हेतूने आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत या महिलांचा सन्मान सत्कार करून गौरविण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संदीप कौर सेखो यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथीनानून लाभलेल्या श्रीमती संगीता ठुबे व श्रीमती उर्मिला खोकले यांच्या मानचिन्ह आणि भेट वस्तू देऊन सौभाग्याचे लेणे असलेले हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि यांनी शाळेचा परिसर आणि शाळेत मिळणार्या शिक्षणांबरोबरच मुलांवर होणारे संस्कार या बाबत कौतुक केले.
यावेळी उवस्थिताना मार्गदर्शन करतांना डॉ.वैशाली प्रतापराव पवार यांनी आपतिग्रस्त आणि विधवा महिलांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.
तसेच संगीता ठुबे आणि उर्मिला खोकले यांचा पुरुषाविना सुरु असलेल्या खडतर जीवन प्रसंग कथन केला. या दोन्ही महिलांवर आलेले कौटोबिक संकटावर त्यांनी कशी मात मिळविली आहे याची माहिती दिली.
त्यामुळे जीवन जगताना या दोन्ही महिलांचा आदर्श घेणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. जीवनात संकट म्हणून नाही तर आव्हान म्हणून बघत हसत हसत आव्हानाला सामोरे जावे असे उपस्थितांना सांगितले.
यावेळी डॉ.प्रतापराव पवार यांनी प्रत्येक महिलेचा सम्मान करावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवनात पर स्त्री ला आईचा दर्जा दिला तसाच आपण सर्वांनी द्यावा असे आवाहन केले.
यावेळी विजय माठा यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमांचे सूत्र संचालन अनिता देसाई यांनी केले.



