दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट… शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
खेडलेझुंगे दि १५ फेब्रुवारी / बाबा गिते
द्राक्षबाग पडल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आणि नुकसानीत भर पडली… ऐन काढणीला आलेला बाग पडल्याने आर्थिक संकटात भर… उराशी बाळगलेले स्वप्न क्षणार्धात धुळीस मिळाले.. खेडलेझुंगे येथील दोन एकर सुधाकर जातीचा मंडप पद्धतीची द्राक्ष बाग पडल्याने भुईसपाट झाली आहेत.
यामुळे शेतकऱ्याचे १० ते १५ लाखांचे नुकसान झालेले आहेत. मोठ्या कष्टाने अनेक संकटांचा सामना करत वाढवलेली बाग द्राक्ष फुगवणीचा कालावधी संपून गोडवा उतरून १० दिवसात खुडण्यास तयार होती. द्राक्ष बागेचे सर्व कामे आवरले होते. या स्थितीतच असतानाच अचानक बाग पडल्याने शेतकऱ्याची मोठी हानी झालेली आहे. बागेचे आधार देणारे एंगल वाकून मोडलेले आहे, तारा तुटल्या आहेत. द्राक्षांचे वजन जास्त असल्याने बाग उभी करणे ही अशक्य झाले आहेत.
बाग पडल्याने नाजूक असलेल्या द्राक्ष वेलींची मोडतोड मोठ्या प्रमाणत झालेली आहे. द्राक्ष मणी गळून पडले आहेत. द्राक्ष शेती ही मोठ्या भांडवलाची असते. लागवड केल्यानंतर १० ते १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पर्यंत द्राक्ष बाग टिकवून ठेवता येतात.
लाखो रुपयांचे भांडवल गुंतवणूक करून उभी केलेली बाग अचानक पडल्याने राहणे कुटुंबीयांचे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
द्राक्ष बाग परिपक्व अवस्थेत पडल्याने द्राक्षाची गुणवत्ता खराब होते. लांब अंतरावर त्यांचे वाहतूक करू शकत नाही. त्यामुळे व्यापारी द्राक्ष खरेदी करत नाहीत. द्राक्षाच्या घडांमधील मनी खूप नाजूक असतात त्यामुळे त्याची खूप मोठ्या प्रमाणात गळ होते. गळ झालेल्या मणी मातीत पडून खराब होतात.
त्या पासून बेदाणा निर्मितीही करता येत नाही. त्यामुळे बाग पडल्याने मोठा तोटा शेतकऱ्यास सहन करावा लागतो. बाग उभी करण्याचा प्रयत्न करूनही झालेले नुकसान कमी होणार नाही. वर्षभराच्या मेहनतीचे फळ पदरात पडण्याच्या काळातच बाग पडल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला.
डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झाल्याने शेतकरी कुटुंबाला दुःख अनावर झाले आहे. वर्षभर बागेची निगा राखत एक्सपोर्ट माल तयार केला होता.
वातावरणातील होणाऱ्या बदलांप्रमाणे औषधे फवारणी, खते दिले होते. यावर्षी चांगला माल तयार झालेला होता. द्राक्ष रशिया येथे एक्सपोर्ट करण्याचा मानस होता. दोन दिवसांपासुन द्राक्ष बाग बघण्यासाठी व्यपाऱ्यांची रेलचेल सुरु झालेली होती. परंतु हे देवाला मान्य नव्हते म्हणुन की काय संपूर्ण द्राक्ष बाग डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने ९-१० लाखांचे नुकसान झालेले आहे. शासनाकडुन मदत मिळाली तर पुन्हा उभे राहणे शक्य होणार आहे अशी आर्त शेतकरी कुटुंबाने दिली आहे.
“पोटाला पीळ देत, लेकराबाळांच्या स्वप्नांना मुरड घालत सर्व काही भाग भांडवल जमा करून द्राक्षशेती पिकवली होती. सुदैवाने बाग ही चांगली आली होती.
परंतु अचानक हे संकट कोसळल्याने सर्व काही होत्याचे नव्हते झाले. बाग सोडून दुसरे उत्पन्नाचे साधन नाहीत. बाग पडल्याने कुटुंबाचा आर्थिक कणा मोडून संसाराचा आधार तुटला आहे.
या आकस्मिक आपत्तीचा शासकीय स्तरावर पंचनामा करून कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा.कैलास राहणे, आपत्तीग्रस्त शेतकरी, खेडलेझुंगे.”