Breaking
महाराष्ट्र

आठवण त्या गेट टुगेदरची

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज :

विंचूर दि २२ जून विशेष प्रतिनिधी सुनील क्षिरसागर 

अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती..” 

“दुःख अडवायला उंबऱ्यासारखा 

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा..”

 

आज आमच्या १९८६ च्या दहावीच्या बॅचचा गेटुगेदर चा (२३ जून) वर्धापन दिन आहे. अस वाटत या सरत्या आयुष्यात मित्र आता पुन्हा -पुन्हा भेटाव. 

गेट टुगेदर काय असतं जुन्या आठवणींना उजाळा देणं. जुन्या सावलींना पुसटस पाहणं, जुन्या ठिकाणचं नकळत दर्शन होणं, यासाठी तर असत गेट टुगेदर. जुने मित्र पुन्हा एकदा तरी एकत्र यावं, जुने प्रसंग पुन्हा आठवावं, कित्येक वर्षांनी एकमेकांना पाहताच घट्ट मिठी मारावी आणि डोळ्यातील अश्रूंना आवर घालावा, एकमेकांना पाहताच आनंद गगनात मावेना.

 मित्र – मैत्रिणीं आता ६० व्या वर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. आणि मागे वळून पाहिले तर आता पर्यंतचे आयुष्य या धावपळीच्या जीवनात कसे सरले हे समजले नाही. आयुष्याच्या आलेल्या कडेवर, हे मित्र कडाला येऊन ठेपली,आणि आयुष्याच्या जिवन पटावर सर्व सुख – दुःख शेर करायला, चेहर्यावरील आनंद परत आनायला ते एकच असं नात म्हणजे फक्त आणि फक्त असतो मित्रच…

सुनील क्षिरसागर, विंचूर.

(नाशिक जिल्ह्या प्रतिनिधी)

माझ्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर दिवसी मनभारावून गेले.

     मी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतो त्या शाळेत सन २००४-०५ या बॅच चा गेट टुगेदर झाले.त्या बॅच चे एकूण ५० विद्यार्थी होते.त्या पैकी साधारण ४२ विद्यार्थी गेट टुगेदर च्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सुरुवातीला आम्हा सर्व गुरुजनांना गेट वरुन फुलांचा वर्षांव करत कार्यक्रम स्थळी आणले विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आम्ही सर्व गुरुजन भारावून गेलो त्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतर मात्र मुलांनी स्वत:ची ओळख व सध्या काय काम करत आहे त्या संदर्भात माहीती करुन दिली.

एकूण आम्हा सर्वांना समाधान वाटले तसेच विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी,शिक्षकां विषयी आदर व्यक्त केला त्याचबरोबर शाळेसंदर्भात कृतज्ञता व्यक्त केली शाळेचे आपण काहीतरी देणलागतो म्हणून शाळेसाठी देणगी म्हणून एक नवा पोडीयम सर्व सोयीयुक्त भेट देण्यात आला खरच अशा प्रकारचे माझी विद्यार्थी मेळावे प्रत्येक शाळेत होणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थी ही एकत्र येतात व शाळेलाही बहुमूल्य वस्तु स्वरुपात देणग्या मिळतात व आपल्या गुरूजनांच्या ही भेटी होतात.

भाऊसाहेब दगुजी म्हसकर 

(प्राचार्य, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नांदुर्डी)

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी..

आपल्याच शाळेत‌ गेल्यावर जर‌ आपलेच बालपण आपल्याला नाही दिसले…तर मग काय शाळेचे दिवस जगलात…

यावरून मला खालील गाण्याच्या ओळी त्या दिवशी आठवत होत्या..

“माझी शाळा मला आजही आठवे‌ते रे

पुन्हा शाळेमध्ये जावेसे वाटते रे…”

  खरच त्या दिवशी मला शाळेच्या जुन्या आठवणी आठवत होत्या..

गेट टुगेदर चे बर्याच दिवसांपासून चालले पण…अखेर २३ जुन तारीख ठरली. त्या दिवशी सकाळी एक वेगळीच हूरहूर लागली होती. सर्व मित्र, मैत्रिणी भेटणार. आपल्याला शिकवणारे सर‌ भेटणार. आणि मुख्य म्हणजे ज्या बाकावर बसून आपण ज्ञानाचे धडे घेतले…कधी खोड्या पण केल्या . त्या बाकावर २-३ तास का होईना पण परत बसायला मिळणार.. आयुष्यातला तो अविस्मरणीय दिवस होता…

     सकाळी निघायला घरातून थोडा उशीरच झाला. पण तिथे गेल्यावर फेटे बांधून आमचे स्वागत झाले…खुप छान वाटले तेव्हा.. सर्व जण आपापला परीचय करून देत होते. तेव्हा उत्सुकता लागली होती की, कोण कोण काय करत असे.

प्रत्येक जण काही ना काही करते असे ऐकुण छान वाटले.एवढ्या वर्षांनंतर सर्वजण भेटल्यामुळे काहीना ओळखायला वेळ लागला. नंतर कोणी आपले मनोगत व्यक्त केले, कोणी कविता केली, कोणी गाणे म्हटले, आपल्या गुरुजना विषयी कृतज्ञता व्यक्त केली…एके काळी आम्हाला शिकवनार्या सरांना आम्ही हात धरून घेऊन जात होतो, त्यामुळे खुप छान वाटले.

     विंचूरच्या स्थानिक मित्रांनी जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट केली होती.त्यामुळे त्यांचे खुप खुप आभार.एकंदरीत असा अविस्मरणिय दिवस उगवला कसा व मावळला कसा ते कळालेच नाही..

सरतेशेवटी परत गाण्याच्या ओळी आठवल्या. 

“हरवली पाखरे…. हरवली पाखरे

उज्वला चौधरी (शिरसाट)

(टपरवेअर मॅनेजर आणि एल आय सी ॳॅडवायझर)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे