Breaking
महाराष्ट्र

तीन दिवसात 13 किल्ले व 21 ऐतिहासिक मंदिरे व स्थळांची भटकंती पूर्ण दिव्यांग अंजली प्रधान यांची भटकंती

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

नाशिक दि १४ जानेवारी उत्तम गारे 

      कोकण दौरा मध्ये दिव्यांग अंजली रंगलाल प्रधान यांनी सहभागी होत 13 किल्ले व 21 ऐतिहासिक स्थळे व मंदिराची भटकंती पूर्ण करत स्वतःतील आत्मविश्वास दृढ केला .TTMM ग्रुप पुणे आयोजित कोकण दौरा मध्ये एकूण 21 सदस्य सहभागी झाले होते.

भटकंती ची विशेष आवड असणाऱ्या अंजली प्रधान नयांनी देखील आपला सक्रिय सहभाग नोंदवला. सगळे मेंबर पुणेच्या आसपासचे होते. फक्त अंजली प्रधान ही सर्वात लांबची असूनदेखील तब्ब्ल 7 तासांचा बस चा प्रवास एकटीने करत पुण्यातून पुढील 7 तासाचा प्रवासासाठी सहभागी झाली होती.

10,11 आणि 12 जानेवारी रोजी ग्रुप लिडर दिपक शेळके ,माधवी भोसले, आकाश वाघ यांच्या मार्गदर्शनात कोकण दौरा पार पडला. या तीन दिवसात जास्तीत जास्त स्थलांना भेटी दिल्या. पहिल्या दिवशी –

10जानेवारी 2025 ला 

बाणकोट किल्ला/हिम्मतगड/Fort विक्टोरिया – पाणबुरूज

वेसवी ते बागमांडला फेरी,

स्वयंभू जीवनेश्वर मंदिर,

हरिहरेश्वर – काळभैरव योगेश्वरी मंदिर, हरिहरेश्वर गणेश गल्ली खाडी,श्री सुवर्ण गणेश मंदिर,

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे स्मारक, सोमजाई देवी मंदिर,

उत्तरेश्वर मंदिर,श्री रूप नारायण मंदिर, दिवेआगार beach 

खोकरी समाध्या (Tombs) 

दिघी पोर्ट ते अगर्दंदा फेरी आणि 

जंजिरा किल्ला.

दिवस दुसरा -11जानेवारी 2025

साम्राजगड किल्ला/ दंडराजपुरी किल्ला,मुरुड बीच 

*पद्मदुर्ग/कासा किल्ला – पडकोट,श्रीकोटेश्वरी मंदिर,

शितळादेवी मंदिर,कोरलाई किल्ला बिर्ला मंदिर, सिद्धिविनायक मंदिर,श्री रामेश्वर देवालय/ रामेश्वर मंदिर,भगवती देवी मंदिर चौल,चौलचा किल्ला/ राजकोट/ हमाम खाना/कलावंतीनचा वाडा,रेवदंडा किल्ला व बीच.

 

दिवस तिसरा -12जानेवारी 2025

कुलाबा/ अलिबाग किल्ला,सर्जेकोट किल्ला,हिराकोट जुना किल्ला,

सरखेल कान्होजी आंग्रे समाधी,

खुबलढा किल्ला/ थळचा किल्ला,जयदुर्ग/उंदेरी किल्ला 

खांदेरी किल्ला इत्यादी.

सहभागी सदस्य –

अलका विटे,माधुरी डुंबरे 

अर्चना अभंग,जयू जोगळेकर 

राजलक्ष्मी परब,वैशाली निकुंभ प्रणिता करणे,माधवी भोसले अंजली प्रधान,दिपक शेळके, आकाश वाघ, मिलिंद पानसरे, भूपेंद्र धारवाणकर,रोहित केले दिनेश निकुंभ, रामचंद्र करणे 

मयंक भोसले,आयुष शिंदे, आर्णव निकुंभ आणि आरव निकुंभ सहभागी झाले होते.

याआगोदर ही अंजनाने ही भटकंती केली होती पण त्यात काही किल्ले नव्हते व ऐतिहासिक स्थळांचा समावेश नसल्याने परत सहभागी होत नव्याने भटकंती केली.

आतापर्यंत अंजली प्रधान ने आपल्या अपंगत्वावर मात करत अनेक गडकिल्ले सर केले आहेत.महाराष्ट्र मधील सर्वात उंच शिखर कळसुबाई सलग 11 वेळा सर करुन जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे.

यात त्यांना गरुडझेप,सक्षम,रॉयल रायडर्स, गडकोट संवर्धन संस्था यांचे मार्गदर्शन नेहमी लाभत असते.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे