Breaking
महाराष्ट्र

एक अवलिया बारा वर्षे लोटांगण घालत भारत व नेपाळची परिक्रमा पूर्ण करणार!

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

   येवला दि. १३ जानेवारी ( प्रतिनिधी) पुष्पा पाटील

३३ महिन्यापासून घरदार सोडून नोकरी सोडून उत्तर उत्तरप्रदेश मधून एक त्यागी महापुरुष संत नरेश गंगावर वय ४९ आहेत.हिंदू जनजागृती व गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे बरोबरच याकरिता बारा वर्षासाठी भारत व नेपाळची सर्व तीर्थक्षेत्रांची लोटांगण भ्रमण यात्रा करणार आहेत.

    उत्तर प्रदेश मध्ये त्यांचे गाव मुजना संतोषगाव,तालुका नवाबबागल,जिल्हा बराली येथून ते सर्व मंदिराचे दर्शन घेऊन निघालेले नरेश गंगवार महाराज हे पदवीधर आहेत.

 

Oplus_131072

बारा वर्षाच्या या प्रवासात ते या दंडवत परिक्रमा मधून बारा ज्योतिर्लिंग,अठरा शक्तिपीठे, चारीधाम सर्व महत्त्वाचे तीर्थक्षेत्र सर्व नदी माता यांचे पूजन करणार आहे.त्यांना काहीतरी साक्षात्कार झाला आणि त्यांनी पूर्णपणे भारत- नेपाळ भ्रमंतीचा निर्णय घेतला यामध्ये त्यांनी कुटुंबाशी चर्चा केली.

परंतु त्यांच्या पत्नी सुमित्रादेवी व मुलगा प्रल्हाद हे पण सर्व सुख सुविधांचा त्याग करत त्यांनीही या भ्रमंती मध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आणि स्थानिक देवदर्शन करून ही दिंडी निघाली.

संभाजीनगर व वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन ते नाशिकच्या दिशेने निघाले असता त्यांना काही संत मंडळींनी त्यांनी कुठे – कुठे वास्तव्य करावे थांबायचे ते कल्पना दिली.

वैजापूर मध्ये त्यांचा मुक्काम असताना नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या तीर्थक्षेत्राला कसे जायचे हे एका संताने त्यांनी बाबा डमाळे पाटील यांचे नाव सुचविले आणि त्यानुसार फोन आला की या महाराजांना पुढील दिशा सांगावी त्यांच्याकडे नकाशा आहेच परंतु आपण मदत करावी.

डमाळे यांनी संभाजीनगर- नाशिक सीमेवर त्यांचा सन्मान करून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था सुरेगाव,गवंडगाव,अंदरसुल, कोटमगाव येथे धार्मिक ठिकाणी केली,तेथून पुढे त्यांना कुणीतरी पुढे मदत केली असेल.

     त्यांच्याकडे तीन चाकी सायकल मुलगा व पत्नी लोटत चालतात यामध्ये चटई,लंगोट व त्यांच्या मुलाचे व पत्नीचे कपडे भोजन सामग्री ठेवलेली असतेश त्यांच्या आहारातील कांदा- लसूण घेत नाहीत.

त्यांना एखादा आश्रम, धर्मशाळा किंवा मंदिर येथे त्यांचे वास्तव्य असतं कोणी जेवण दिल तर त्याचे पथ्य ते सांगतात, सांगून घेतात, ते कुणाच्या भरोशावर प्रवास करत नाहीत सामान्य कुटुंब आहे त्यांच्या अपेक्षा काहीच नाही आणि ते कोणाकडे मागूत नाही,खात नाही,कुणाचे पैसेही घेत नाहीत, कुणाच्या घरी थांबत नाहीत.त्यांच्याकडे राहण्यासाठी टेन्ट सुद्धा आहे.

पहाटे उठून थंड पाण्याने आंघोळ करून पूजा अर्चा करून ज्या ठिकाणी धार्मिक हिंदू देवतांचे देवस्थाने आहेत तेथे जाऊन ते स्वतः उच्च शिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांचा प्रचंड अभ्यास आहे धर्माची जनजागृती करतात.

गोमातेचे महत्त्व सांगतात.देव-देश आणि धर्मावर,देशसेवे वरती,सामाजिक सेवेवरती सर्व बाबींवरती थोडक्यात बोलतात.खुर्चीवर बसत नाहीत पलंगावर, गादीवर वरती झोपत नाही.आणि पुढील लोटंगण परिक्रमासाठी मार्गस्थ होतात. 

    बारा वर्षाच्या या भारत व नेपाळ भ्रमंतीनंतर पुढे काय? करणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणतात रामभरोशे,भगवंत करेल त्या दिशेने जाईल येवल्याहून ते आता सप्तशृंगी देवी माते गडावर जाऊन नंतर नाशिक- त्र्यंबकेश्वर करणार आहेत.

पुढील त्यांचा प्रवास काही माहीत नाही,अशी माहिती बाबा डमाळे पाटील यांनी सांगितली.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे