प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असे सिन्नर तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन!!
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि २६ जुलै प्रतिनिधी – सुयोग वाजे
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2025/26 या वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी पिक विमा योजना सुरू आहे.
सिन्नर तालुका कृषी विभागात तालुक्याचे कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाटे तसेच नायब तहसीलदार मुंदडा साहेब व कृषी मंडळ अधिकारी पगार साहेब, कृषी सुपरवायझर आदमे साहेब तसेच विस्तार अधिकारी देशमुख साहेब मोकळ मॅडम,महसूल मंडळ अधिकारी शेलावटे साहेब,पालवे साहेब व शिरोडे साहेब, तसेच गिरी साहेब,गडाख साहेब पिक विमा प्रतिनिधी सुयोग वाजे या सगळ्यांचे हस्ते पिक विमा पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांना सूचना देण्यात आली आहे की गावामध्ये जास्तीत जास्त पिक विम्याची प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी.
या योजनेत शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आहे. म्हणून या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आव्हान सिन्नर तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाठे यांनी केले आहे.
या योजनेच्या प्रचार प्रसिद्धी करिता भारतीय कृषी विमा कंपनी कडून पूर्ण तालुक्यात दोन दिवस गावागावात सीएससी केंद्र, कृषी सेवा केंद्र,तसेच बाजार इत्यादी ठिकाणी जाऊन जोरदार प्रचार प्रसिद्ध सुरू आहे.
तसेच कृषी विभागाचे कृषी मंडळ अधिकारी, कृषी सुपरवायझर,कृषी सहाय्यक बंधू आणि भगिनी व विमा प्रतिनिधी यांचे शेतकऱ्यांना पिक विम्याची पाठशाळा घेऊन माहिती व मार्गदर्शन दिले जात आहेत.
नाशिक जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा (AIC) कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून शासनाच्या नवीन धोरणानुसार राज्यात नवीन पिक विमा योजना राबवली जाणार आहे.
खरीप हंगामा करिता शेतकऱ्यांना फक्त दोन टक्के हप्ता नमूद करण्यात आला आहे. या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधी सूचित क्षेत्रातील पिकांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आलेली आहे.
परंतु कर्जदार शेतकऱ्यांनी तसेच संबंधित बँकेस किंवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेत कळविणे बंधनकारक असणार आहे.
त्याकरिता शेतकऱ्याला आधार कार्ड, बँक पासबुक, सात बारा उतारा,व पीक पेरणी स्वयंघोषणापत्र,या कागदपत्रांची पूर्तता करून आपले सेवा केंद्र,ग्रामपंचायत सीएससीकेंद्र, सीएससी केंद्र,सायबर कॅफे,व राष्ट्रीयकृत बँकांशी संपर्क करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचे पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंत नुकसान होऊ नये म्हणून पिक विमा घेणे गरजेचे आहे.
या कालावधीमध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती,पावसातील खंड,दुष्काळ,स्थानिक नैसर्गिक आपत्ती,गारपीट,चक्रीवादळ, भूस्खलन,कीड व रोग,एन पासून झालेल्या नुकसानीत उत्पन्नात येणारी घट गृहीत धरून पिक विमा भरपाई मिळू शकते.
खरीप हंगामात सोयाबीन,मका,बाजरी,भुईमूग, खरीप कांदे,भात,ज्वारी,तूर,मूग,उडीद,कराळे, कापूस या पिकांसाठी विमा जोखीम आहे.

पिक विमा घेतल्यानंतर शेतकरी बंधूंनी पीक विम्याची पावती घेऊन त्यावर असलेले नियम वाचून घ्यावेत.
शेतकऱ्याच्या होणाऱ्या नुकसानी पासून वाचायचे असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी प्रधानमंत्री पीक योजनेचा लाभ घ्यावा.
अशी सूचना सिन्नर तालुका विमा कंपनीचे अधिकारी सुयोग वाजे साहेब यांनी केली आहे.