Breaking
आरोग्य व शिक्षण

श्री.भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी च्या दहावीच्या 2001-02 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

कोल्हापूर दि १६ में विशेष प्रतिनिधी 

श्री भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी च्या दहावीच्या 2001-02 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा यशस्वीपणे उत्साहात पार पडला. 

सदर मेळावा मासेवाडी फाटा येथील हॉटेल ए. जे मध्ये झाला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बी. एस कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर श्री जे. टी रावण सर श्री ए. डी.आजगेकर सर श्री झारी सर श्री आर. बी किल्लेदार सर व मुख्याध्यापक श्री एस आर मुंडे सर उपस्थित होते .

लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. महाविद्यालयाची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी मेळाव्यास उपस्थित 30 विद्यार्थीनी. आपला परिचय करून दिला. त्यांचा सध्याचा जीवनक्रम सांगितला. गुरुजनांचा शाल पुष्प व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री सचिन सावंत यांनी केले. स्वागत गीत श्री रावण सरांनी आपल्या मधुर आवाजात म्हंटले व सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी बोलताना श्री कुलकर्णी सर म्हणाले की सर्वानी चांगले राहावे आरोग्य हीच संपत्ती असून आरोग्याकडे लक्ष द्यावे. सामाजिक मूल्यांचे महत्व सांगून व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केले.

श्री मठपती सरांनी सर्वांना शाळेतील शिस्त कशी होती असेच सर्वानी आपल्या क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करावी. माजी विद्यार्थ्याच्या यश हाच आमचा आनंद आहे असे म्हंटले.

श्री झारी सर बोलताना म्हंटले की मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे आहे पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या व डिजिटलायझेशनच्या युगात इंग्रजी भाषा अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी आहे.

 

कारण ही जगाची भाषा आहे. म्हणूनच इंग्रजीला वाघिणीने दूध संबोधले गेले आहे. त्यामुळे ती सर्वांना सफाईदारपणे आली पाहिजे . यावेळी त्यांनी मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है.

मुख्याध्यापक श्री मुंडे सर यांनी शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रम माहिती तसेच शाळेची प्रगती सांगितली.

 श्री आजगेकर सर बोलताना म्हणाले की माजी विद्यार्थी मेळावा तुम्हाला भेटण्यासाठी आणि अर्थातच शिक्षकांशी असलेले बंध पुन्हा निर्माण करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ आहे.

यावेळी सचिन सावंत यांनी शिक्षकांनी विद्यार्थी असताना दिलेले योगदान तसेच स्नेह मेळावा घेण्याचे फायदे सांगितले .कवी कुसुमाग्रज यांची “कणा “कवी ते मधील ” ओळखला का सर मला पाठी वरती हात ठेवून लड म्हणा ” म्हणुन सर्व विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षकांचा नेहेमी आशिर्वाद मिळत असतो. 

 

लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. प्रत्यय रविवारी 11 मे 2025 रोजी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला.

जवळपास 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.

 

धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला असला तरी पण श्री भैरवनाथ हायस्कूलची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येक विद्यार्थी बोलून दाखवत होता. या वेळी सर्व विद्यार्थी लहान होऊन शाळेच्या गोड आठवणीत रमले होते, या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जून्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी छड्या ही खाल्ल्या. हसत खेळत संपूर्ण दिवस कसा गेला हे कोणालाच कळले नाही.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत लाड महादेव शिपूरकर अरविंद कापसे राहुल महिंद अनिल नाईक मचिद्र सुतार विजय कांबळे काशिनाथ कापसे दत्तात्रय अत्याळकर अनिल पाटील नितीन नलावडे संतोष कडाकने धोंडिबा मिसाळ तानाजी पावले ज्योती आजरी रूपाली मिसाळ संध्या मुळे कविता लाड मंगल पाटील राजश्री आयवाळे रूपाली काकडे गीता मिरजकर आणि सर्वतोपरी सहकार्य लाभले.

विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आले. सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

शाळेची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले. यावेळी ज्योती आजरी हिने सर्वांचे आभार मानले.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे