टेक ऑफ पूर्वीचा तो शेवटचा फोटो आणि काही क्षणातच काळाने घातला घाला ! महाराष्ट्राने आपला’दादा’गमावला
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
मुबंई दि.२८ जानेवारी
आजची सकाळ महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे.
सोशल मीडियावर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो ठरला आहे.
हा फोटो आज सकाळी मुंबईतील GA टर्मिनलवर विमानाने टेक-ऑफ करण्यापूर्वी काढण्यात आला होता.
चेहऱ्यावर नेहमीचा तोच आत्मविश्वास आणि कामाचा ध्यास घेऊन,अजित पवार यांनी सकाळी ८:१० वाजता बारामतीसाठी उड्डाण केले होते. बारामती येथील नियोजित दौऱ्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आपल्या खासगी विमानाने निघाले होते,पण हा प्रवास त्यांचा अखेरचा प्रवास ठरेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
मुंबईवरून निघालेले हे ‘लियरजेट ४५’ (Learjet 45) विमान अवघ्या ४० मिनिटांच्या प्रवासानंतर बारामतीजवळ पोहोचले.सकाळी ८:५० च्या सुमारास विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या तयारीत असतानाच ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.
विमान धावपट्टीवर उतरत असतानाच तांत्रिक बिघाडामुळे किंवा खराब हवामानामुळे विमानाचा भीषण अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला.
ही आग इतकी भीषण होती की त्यात कोणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही.या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील दोन वैमानिक आणि दोन सहकारी अशा एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.
नेहमीच लोकांमध्ये मिसळणारे, रोखठोक बोलणारे आणि पहाटेपासून कामाला सुरुवात करणारे अजित दादा अशा अचानक एक्झिट घेतील,यावर आजही कोणाचा विश्वास बसत नाही.
तो व्हायरल झालेला फोटो पाहताना मनाला चटका लावून जातो की,काही मिनिटांपूर्वी जे व्यक्तिमत्त्व धडाडीने पुढील कार्यक्रमाच्या नियोजनात होते,ते आता आपल्यात नाही.
संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे सुन्न झाला असून बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.