लासलगांव ग्रामपंचायतीला नगरपरिषद रूपांतर करा लासलगाव शहर विकास समितीची मागणी सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
लासलगांव दि ०५ फेब्रुवारी प्रतिनिधी निशिकांत पानसरे
लासलगाव ग्रामपंचायतीला नगरपरिषद रुपांतर करा अशी मागणी लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शहर विकास समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,खासदार भास्कर भगरे,जिल्हाधिकारी जलज शर्मा,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन सादर केले आहे.

समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की लासलगाव हे आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे कांदा मार्केट आहे तसेच लासलगाव शहरांची लोकसंख्या ही 30 हजाराहून अधिक आहेत.
तसेच शहराला लागूनच पिंपळगाव नजिक ब्राह्मणगाव व टाकळी ( विंचूर ) ही शेजारील लागून असलेल्या ग्रामपंचायत आहेत.
लासलगाव शहर परिसरात अकृषी व्यावसायिकांचे प्रमाण देखील लक्षणीय आहेत.

लासलगाव हे ग्रामपंचायत क्षेत्र असून शहराची लोकसंख्या ही नगरपरिषद क्षेत्रा इतकी झाली असल्याने,ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरवताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
शहरात पिण्याच्या पाणी घनकचरा व्यवस्थापन भूमिगत गटार शहर स्वच्छता व इतर नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत आहेत.
ग्रामपंचायत मधील निर्णयात राजकीय हस्तक्षेपामुळे महसूल वाढ करण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले आहे.
तसेच ग्रामपंचायतीचे नगरपरिषद रूपांतर झाल्यास त्यांचा नागरिकांना फायदा होईल व नागरिकांना मूलभूत सुविधा व त्यांच्या हक्क व्यवस्थितरीत्या प्राप्त होतील.

त्यामुळे लासलगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर हे नगरपरिषदेत करण्यात यावे.
अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर समितीचे राजेश कराड,संदीप उगले,शेखर कुलकर्णी,विकास कोल्हे,मयूर झांबरे,सुरेश श्रीवास्तव,संकेत वाळेकर,चंद्रकांत नेटारे,प्रकाश पाटील,बापू कुशारे,भूषण वाडेकर,धर्मेश जाधव,महेश मोरे,महेंद्र हांडगे,दत्ता कुमावत,अमोल कुमावत,बाळू सोनवणे,प्रमोद पाटील,अभिनव भंडारे,सतीश खैरनार,शुभम शेरेकर,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



