न्यायभूमी न्यूज
येवला दि १६ ऑगस्ट अभय पाटील

दि.१४ ऑगस्ट गुरुवार रोजी दै.अक्षराजचा वर्धापनदिनानिमित्त आदरणीय मान्यवर मा. नवनाथ मदने (पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय,पुणे ग्रामीण), मा.भगवानराव वैराट (संस्थापक अध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल),मा.हेमंत मुसरीफ (सुप्रसिद्ध कवी,पुणे) आणि मुख्य संपादक विनोदजी गोरे व सह संपादिका प्राजक्ता गोरे, पत्रकार बांधव,अक्षराज मीडिया परिवार आणि आळंदीकर बांधव उपस्थित असणार आहे.
आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण दैनिक अक्षराज हा केवळ एक वृत्तपत्र नाही… ते आपल्या जनतेचा आवाज आहे, आपल्या हक्कांचा प्रहरी आहे,आणि सत्याचा अखंड दीप आहे.
आळंदी ही संत परंपरेची संत ज्ञानेश्वर माऊली ची पावन भूमीत ज्ञानदीप प्रज्वलित केला, आणि आज त्या ज्ञानदीपाचा किरण दैनिक अक्षराज या वृत्तपत्रातून प्रत्येक घरात पोहोचत आहे.
हा पेपर म्हणजे फक्त बातम्या देणारे पान (वृत्तपत्र) नाहीत – तर तो आहे सत्याचा श्वास, लोकशाहीचा नाडा,आणि समाजाच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब!
पत्रकारिता म्हणजे जबाबदारी. ती म्हणजे सत्तेला प्रश्न विचारण्याचे धाडस,अन्यायाला आव्हान देण्याचे सामर्थ्य, आणि चांगल्या गोष्टींना जगासमोर मांडण्याची उमेद.
दैनिक अक्षराज ने गेल्या चार वर्षांपासूनच्या काळात हेच केले – निर्भीडपणे,प्रामाणिकपणे, जनतेसाठी.
सामाजिक विषयांना न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिकपणे काम केले.
आपण सारे जाणतो, आजच्या डिजिटल युगात खोटं पसरवणं सोपं झालं आहे… पण खरं पसरवणं अवघड झालं आहे.ही अवघड वाट निवडणं, सत्यावर ठाम राहणं – हेच अक्षराजचे बळ आहे.
माझी अपेक्षा आहे – हे वृत्तपत्र केवळ बातम्यांपुरतं मर्यादित न राहता,शेतकऱ्यांच्या वेदना,तरुणांच्या स्वप्नांना,महिलांच्या हक्कांना, आणि आपल्या संस्कृतीच्या वारशाला आणखी बळ देत राहो.
संत माऊलींच्या आशीर्वादाने दैनिक अक्षराज पुढील अनेक वर्षे सत्याचा दीप प्रज्वलित ठेवो – आणि आपण सारे त्या प्रकाशात नवनिर्माणाचा मार्ग चालू.
धन्यवाद!
जय महाराष्ट्र!

आपलाच एक पत्रकार मित्र.
सुनील क्षिरसागर, विंचूर.
(नाशिक जिल्हा प्रतिनिधी)