Breaking
महाराष्ट्र

विंचूर शहरातील थेटाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पावसाने अचानक खचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज

विंचूर (नाशिक) दि ०३ जुलै : विशेष प्रतिनिधी सुनील क्षीरसागर 

विंचूर शहरातील थेटाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पावसाने अचानक खचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

पुलाच्या मध्यभागी खड्डा पडल्याने हा पूल तातडीने वाहतुकीस दुरुस्त अथवा नव्याने करून देण्यात यावा अशी मागणी त्या रस्त्यालगत च्या शेतकरी,दुग्ध व्यवसायीक आणि शाळेत जाणारे विद्यार्थी यांची शासनाला कळकळीची विनंती आहे.

 विंचूर थेटाळा रोड वरील लोणगंगा नदीवरील पूलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात सदर पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने तो खचला आहे.तसेच मोठे- मोठे खड्डे पडलेले आहे.

त्यामुळे लोणगंगा नदीवरील पुलावरून शालेय विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकरी, शेतीसाठी लागणारे मजूर,व शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात या पुलावरून होत असते. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्याने,पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे.

तसेच विठ्ठलवाडी, कृष्णवाडी, थेटाळे येथून शाळेत येणारे विद्यार्थी तसेच शेतकरी यांची वाहतूक टप्प होते.

त्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच दूध उत्पादक शेतकरी यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. तसेच लोणगंगा नदीवरील पूल कधी कोसळेल हे सांगता येत नाही.

पुल जर तुटला बराच लोकांचा,शाळेत जाणारे विद्यार्थी व व्यावसायिक यांचा संपर्क तुटेल आणि या पुलावर काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

 शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर फुल दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून व लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही केली जात आहे. निवेदन देऊनही पुलाचे पुनर्बांधणी होत नाही.

त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनास इशारा दिला आहे की,लवकरात लवकर काम करावे अन्यथा पुलाव आंदोलन करण्यात येईल.

……….. प्रतिक्रिया १—

आम्हाला या पुलावरून दिवसातून दहा वेळा ये जा करावी लागते.छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला विंचूर गावात यावे लागते.

पुलाची तर अशी परिस्थिती झालेली आहे कधी पडेल सांगता येणार नाही.तरी शासनास विनंती आहे की,लवकरात लवकर पुलाचे काम करावे अन्यथा आम्ही पुलावर आंदोलन करू. 

 प्रभाकर गलांडे (शेतकरी,विंचूर) 

—- प्रतिक्रिया २————–

आम्ही भुजबळ साहेबांना निवेदन दिलेले आहे. निवेदन देऊन देखील कोणीही या पुलाकडे येण्यास तयार नाही.पूल कधी पडेल हे सांगता येणार नाही.

अशी परिस्थिती पुलाची झालेली आहे.

आमचे शाळेतील मुले या पुलावरून शाळेत जात असतात एखाद्या वेळेस काही घटना झाल्यास याला जबाबदार कोण ? 

वारंवार आम्ही निवेदन दिले आहे.तरी देखील प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये.

तरी प्रशासनास विनंती आहे की,लवकरात लवकर पुलाचे काम करावे ही विनंती. 

नरसिंग दरेकर.

(शेतकरी समाजसेवक,विंचूर)

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे