विंचूर येथे स्नेह मेळाव्यात ४२ वर्षांनी भेटले विद्यार्थी विद्यार्थिनी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि. १२ जानेवारी सुनील क्षीरसागर
विंचूर येथील कर्मवीर विद्यालयाचे १९८२ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, विंचूरची कुलस्वामिनी श्री लोणजाई माता गडावर उत्साहात साजरा झाला.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य असे होते कि, तब्बल ४२ वर्षानी शिक्षक आणि विद्यार्थी हे एकत्र आले होते. इतक्या वर्षानी स्नेह संमेलनाचे नियोजन ठरले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी विंचूर येथील स्थानिक विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता.

बऱ्याच कालावधीनंतर आज सर्वच विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक एकत्र आले. आणि यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी हयात नसलेले शिक्षक, विद्यार्थी याच्या स्मृतिला उजाळा देण्यात आला.
एकत्र बसून खाल्लेले डबे, निकालाच्या दिवसांची भिती, बोर्डाच्या परिक्षा हातावर खाल्लेलेल्या छडया, कबड्डीचे डाव, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस, अशा अनेक जुन्या गोष्टीवर चर्चा झाली.

कर्मवीर विद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उद्योग, राजकारण, शिक्षक, कृषी, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करत असून, त्यांनी आपल्या कामाच्या क्षेत्रात नावलौकिक कमावले आहे. यावेळी उपस्थित शिक्षक सोनवणे एन पी, पाटील ए जी, बागुल सी जी, कापडणीस डी यु, दराडे एम आर, शिवाजी शेटेसर, पाटील एस टी, जाधव सि टी, कन्हेरे मॅडम, कदम मॅडम, आव्हाड बी पी, जनार्दन साळी, मनोहर साळी, अंबादास सूर्यवंशी या शिक्षकांना भेट वस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यकर्माचे सुत्रसंचालन दिपक आहेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी स्थानिक विद्यार्थी गोपाल भट्टड, धोंडीराम शिरसाठ, के बी दरेकर, दिनकर चव्हाण, गोरख डावरे व आदींनी या स्नेहमेळाव्याचे विशेष नियोजन केले होते.
——————-
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ! दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती !! इयत्ता दहावी १९८२ ची बॅच अविस्मरणीय गेट टुगेदर… त्या जुन्या आठवणी ते खोडसाळ क्षण, जीवनातील घडामोडी ! रोज नवे धडे, रोज नवी धडपड ,रोज खाडाखोडी !! आठवले ते बालपण, किंचित निरागस, हिरमुसलेले ! आनंदाचे क्षण लवकर संपतात, बरेच काही शिकवून जातात, बरेच काही देऊन जातात ह्रदयात प्रेमाचा ठेवा ठेवून जातात…
– प्रदीप काशीकर- (संगीतकार)



