सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्शभूमीवर नांदूरमध्यमेश्वरला विकास कामे करावी – दरेकर
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

न्यायभूमी न्यूज
खेडलेझुंगे दि ०२ मार्च/ बाबा गिते
दक्षिण काशी म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या किंबहुना रामायणामुळे ऐत्यहासिक पौराणिक महत्त्व असणाऱ्या श्री क्षेत्र नांदूरमध्यमेश्वर येथे आगामी सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्शभुमीवर येथील गंगा घाट, गंगा मध्यमेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा कायमस्वरूपी रस्ता बनविण्याबरोबरच कुंभमेळा काळात येथे गोदावरी शाही शनादाठी पर्वणी निश्चित करावी.
अशी मागणी राष्ट्रीय मजूर महासभेचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र इंजिनियर असोशिएशनचे प्रदेश अध्यक्ष शंकर दरेकर यांचेसह नांदूरमध्यमेश्वर ग्रामस्थांनी केली आहे. नांदूरमध्यमेश्वर येथे शंकर दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी सिहस्थ कुंभमेळा धर्तीवर ग्रामस्थांची बैठक नुकतीच संपन्न झाली.
त्यावेळी ग्रामस्थांनी आपा-आपली मते व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा वेळी शाही स्नान पर्वणी तारखा निश्चित केल्या जातात. नाशिक त्र्यंबकेश्वर प्रमाणेच प्रमाणेच नांदूरमध्यमेश्वर क्षेत्राला अनन्य महत्व आहे. किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्व आहे.
रामाने मायावी हरणाचा पाठलाग करीत याठिकाणी बाण मारल्याने हरणाच्या पायाची खुर तुटली आणि याचं ठिकाणी गोदावरी दारणा कादवा नद्या दक्षिण वाहिनी झाल्याने येथे काशी पेक्षा जास्त पुण्य लाभते अशी अख्यायिका आहे. येथे पक्षी अभयारण्य, ब्रिटिश कालीन धरण, पुरातन मंदिरे, वाडे आहेत. यामुळे या स्थानाला अधिक महत्व आहे.
मात्र हा परिसर विकासापासून वंचित आहे. त्यामुळे गोदावरी नदीवर घाट बांधणे तसेच पुरातन मंदिरांची डागडुजी करणे, गंगा मध्यमेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी पक्का रस्ता करणे, याबरोबरच सिहस्थ कुंभमेळा काळात येथे शाही पर्वणी निश्चित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच यासाठी ग्रामस्थांचे मदतीने शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शंकर दरेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी उपस्थितांनी येथील पुरातन मंदिरे, वाडे, नदी परिसर, गंगामध्यमेश्वर मंदिर, ब्रिटिश कालीन धरण, आदींसह परिसराची पाहणी केली. याप्रसंगी त्यांचे समवेत नर्मदा आश्रमाचे सतीशगिरिजी महाराज, शशिकांत शिंदे, सतिश शिंदे, दीपक इकडे, भाऊसाहेब डांगले, सतिश पुंड, सुनिल जाधव, किशोर शिंदे, शांताराम दाते, विशाल शिंदे, बाबुराव शिंदे, नवनाथ बर्डे, नामदेव माळी, आदीसह नांदूरमध्यमेश्वर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.